पिंपरी : टीडीआर खरेदी – विक्री झालेल्या व्यवहारात जीएसटी भरला की नाही, याची तपासणी करण्यासाठी राज्याचे जीएसटी पथक महापालिकेत दाखल झाले आहेत. त्यामुळे टीडीआर मिळवून देणारे ठेकेदार, आणि व्यवहार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
बांधकाम परवाना विभागात टीडीआर खरेदी – विक्री झालेल्या फाईल्सची तपासणी सुरू आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात शहर आराखड्यात आरक्षणाखाली असलेली जमीन हस्तांतरित करताना जमीन मालकाला टीडीआर देते. तसेच पालिका रस्ते उद्याने, मैदाने आणि आरक्षित भूखंडांवर विकास करण्यासाठी बांधकाम टीडीआर देण्यात येतो. राज्य सरकारने विकास नियमावलीतील रस्त्यांच्या टीडीआर रुंदीनुसार ०.४० ते १.४० पट वापरण्याचे धोरण वाढले आहेत. टीडीआर स्वीकारल्यानंतर बांधकाम प्रकल्प रावेत, वाकड, चिंचवड, ताथवडे, पुनावळे, किवळे, मामुर्डी, पिंपळे निलख, पिंपरी भागात बांधकाम व्यावसायिकांनी भोसरी, मोशी, चिखली, च-होली टीडीआर वापरला आहे.
अशा प्रकरणांमध्ये जीसीएसटी भरला आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी राज्याचे पथक आले आहे. हे पथक टैक्स इन्व्हाईस, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि काही महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. तसेच शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या जागेच्या खरेदी – विक्री व्यवहाराची देखील तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे जीएसटी बुडविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हे पथक कशासाठी आले याबाबत पालिका परिसरामध्ये चर्चा सुरू होती. पथकाकडून तपासणी सुरू आहे.
महापालिकेत राज्य शासनाच्या जीएसटी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आले आहेत. याविभागाने यापूर्वी माहिती मागविली होती. आम्ही माहिती दिली होती. त्यानंतर हे पथक पुन्हा आले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी टीडीआर खरेदी – विक्री झालेल्या व्यवहारासंबंधी सर्व कागदपत्रे तपासणीसाठी दिली आहेत. त्या पथकातील कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करत टीडीआर खरेदी – विक्रीच्या फाईल्स तपासणीला दिलेल्या आहेत.
– मकरंद निकम, शहर अभियंता…




