पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागातील प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३ जून रोजी संपन्न होत आहे. त्यासाठी अजित पवार आज शहरात वेळेपूर्वीच आले त्यामुळे प्रशासन व कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
सकाळी महापालिका आवारात पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या. अग्निशमन विभागाला गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्सचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाघ यांच्यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.




