चांदखेड : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय विभागाकडून एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल ,चांदखेड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. एलिमेंट्री परीक्षेचा निकाल ९७.७७ टक्के लागला. या परीक्षेसाठी एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. अ श्रेणी मध्ये ६ विद्यार्थी, ब श्रेणी मध्ये१३ विद्यार्थी आणि क श्रेणी मध्ये २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९६.९६ टक्के लागला. या परीक्षेसाठी एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. ब श्रेणी मध्ये ८ विद्यार्थी व क श्रेणीमध्ये २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांना कला अध्यापक युवराज शेलार यांनी मार्गदर्शन केले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व कला अध्यापक यांचे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. सत्यवान पवार यांनी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले.



