पिंपरी : राष्ट्रवादी, शिवसेना व कॉग्रेस असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढविण्यास इच्छुक आहोत. प्रत्येक मित्र पक्षाने आपल्या ताकदीनुसार, व्यवहार्य जागा मागाव्यात. काहीही मागायला लागले, तर जमणार नाही. एकला चलो रे म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चिंचवड येथे शुक्रवारी मेळावा झाला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेशचे रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, योगेश बहल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात आमच्या पक्षाचे अधिक प्राबल्य आहे तसे मुंबईत शिंवसेनेची ताकद आधिक आहे. त्यामुळे तिकीट वाटपात ज्याची ताकद आहे त्या प्रमाणात जागा मागितल्या तर आघाडी करू जर अधिक जागांसाठी हट्ट केला तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.




