आकुर्डी : पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर आयोजित तिसऱ्या टप्यातील नेत्र चिकित्सा तपासणी शिबिरामध्ये अजंठानगर व आंबेडकरनगर, दुर्गानगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने संपन्न झाले.
यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि शस्त्रक्रियेची आवश्यक्ता असणा-या नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रियाही शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. नगरसेविका सौ.वैशालीताई काळभोर, अध्यक्ष समाजिक न्यायविभाग सौ.गंगाताई धेंडे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, मुकुंददादा काळभोर, सतीशभाऊ लांडगे, विजय धेंडे, गोकुळ धापटे, संजय धेंडे, प्रतीक साळुंके, खंडेराव काळे, सय्यद पटेल, सुनील शेलार, योगेश काळभोर, अरुण पात्रे, प्रीतम तेलंग, गणेश आलेगावकर, सागर घनवट, विशाल ससगणे, अमोल शिर्के, सचिन मोकाशी, अज़िंक्य काळभोर, तुषार दिघे, अतुल चव्हाण, विकास ठाणांबीर, निखिल पवार, रूपेश धेंडे, साजीत शेख़, माउली काळभोर, प्रणिल साबळे, सुजय कांबळे, अभय भोसले, ऋषिकेश धिवार, अनिल पाटेकर, आदित्य सोणवने, सोहेल शेख़, क़ासिफ खान, किरण मोरे, अभिषेक जमादार, प्रकाश जमादार, अविनाश आहेर, सिद्धार्थ लगाडे, विशाल साबळे, राजू सातपुते व प्रमुख पदाधिकारी व युवा मित्र अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट दिली.