पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीसपदी उत्तमदादा प्रतापराव धनवटे, शहर उपाध्यक्षपदी अविनाश तुकाराम गायकवाड व प्रशांत हनुमंत देवकाते यांना फेरनियुक्तीचे पत्र देताना शहरअध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहरअध्यक्षा कविताताई आल्हाट, मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मा. नगरसेवक प्रवीण भालेकर, युवक अध्यक्ष इब्रान शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे यावेळी उपस्थित होते.
यावेळी जगदीश शेट्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, प्रवक्ते फजल शेख, दीपक सामोरे, युवती अध्यक्षा सौ. वर्षाताई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.




