तळेगांव दाभाडे : टीडीएफ चे पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा टीडीएफ पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय *मा आमदार शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार* व जिल्हास्तरीय *मा.आ आमदार शिवाजीराव पाटील स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्काराचे* आयोजन केले जाते.
यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून सदर पुरस्कार गुरुवार दि.09/06/2022 रोजी दु. 12.30 मि. शिक्षक भवन तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले जाणार आहेत.
कार्यक्रम रावसाहेब आवारी संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक, संयुक्त महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली केशरताई पवार अध्यक्षा पुणे जिल्हा सह. दूध उत्पादक संघ यांच्या हस्ते व जी. के. थोरात कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य टीडीएफ के.स. ढोमसे, विश्वस्त महाराष्ट्र राज्य टीडीएफ मोनिका हरगुडे, सभापती पंचायत समिती शिरूर, सविता प-हाड उपसभापती पंचायत समिती शिरूर, वसंतराव ताकवले अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, मुरलीधर मांजरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टीडीएफ, तुकाराम बेनके अध्यक्ष शिरूर तालुका मुख्या.संघ रामदास थिटे ,सचिव शिरूर तालुका मुख्या. संघ , शिवाजीराव कामथे ,अध्यक्ष पुणे शहर टीडीएफ, पंकज घोलप, सचिव पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवर
A)माजी आमदार स्व. शिवाजीराव पाटील स्मृती राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार
पुरस्कारार्थी- मा.नानासाहेब बोरस्ते , माजी शिक्षक आमदार, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ.
B) जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
1) मा. अनिल साकोरे-शिरूर
2) सौ. स्वाती उपार- आंबेगाव
3) सौ. सौ शोभा तांबे- जुन्नर
4) मा. दिलीप पापळ- पुरंदर
5) मा. सचिन दुर्गाडे- पुणे शहर
6) मा.सुनील ताकवणे- दौड
7) सौ.किर्ती मोटे- पिंपरी चिंचवड
8) मा. गणेश कोतवाल- खेड
9) मा. पांडुरंग पवार- हवेली
10) मा. अंकुश कुडपणे -वेल्हे
11) मा. गुणवंत वाघमोडे -इंदापूर
12) मा.किशोर दरेकर- बारामती
13) मा.राजेंद्र शेटे -भोर
14) मा.धर्मराज साळवे- मुळशी
15) मा.अशोक धनोकार- मावळ
पुरस्काराचे आयोजन व नियोजन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,पुणे जिल्हा टीडीएफ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. धर्मेंद्र देशमुख, राज्य प्रतिनिधी टिडीएफ, मा. सोमनाथ भंडारे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, मा. अशोक दरेकर ,उपाध्यक्ष पुणे जिल्हा टीडीएफ तसेच मा गणेश मांढरे अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ शिरूर मा. नवनाथ धुमाळ अध्यक्ष शिरूर तालुका टीडीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, शिरूर तालुका टीडीएफ व शिरूर तालुका माध्यमिक शिक्षिका संघाच्या सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने करण्यात आले आहे.




