पिंपरी : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना दोन्ही बाजूंनी एकेक मतासाठी गोळाबेरीज करण्यात येत आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रदीर्घ उपचारानंतर घरी विश्रांती घेत आहेत. अशावेळी ते मतदानासाठी जातील का? याबाबत चर्चा सुरू होती मात्र त्यांना खास विमानाने मतदानासाठी मुंबई येथे नेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून एका एका मतासाठी भाजप व महाविकास आघाडी यांच्यात चुरस सुरू असताना चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजपच्या मदतीला धावून जाणार असून विधान परिषदेसाठी मतदान करण्यासाठी उद्या ते मुंबईला जाणार आहेत. जगताप यांना गेली दीड महिना बाणेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप | मतदान करण्यासाठी मुंबईला जाणार की नाही याबाबत पिंपरी चिंचवड शहरात चर्चा होती. लक्ष्मणभाऊ जगताप कसले प्रकृती पूर्णपणे बरी नसतानाही पक्षाला आपल्या एका मताची गरज लक्षात घेऊन ते उद्या मुंबईला जाणार आहेत.




