मुंबई : राज्यभरातील २१६ नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (९ जून) केली.
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या २१६ मध्ये २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी १० जूनला नोटीस प्रसिद्ध करतील.



