पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत शहरातील अनेक चौक सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्या पिंपरी चिचवड शहरात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शहरातील विविध चौकात वेगवेगळ्या कलाकृती शिल्प यांचे उद्घाटन होणार आहेत. यामुळे शहराला नवा लूक मिळणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळील मोरवाडी चौकात मेट्रो ब्रिज खाली लाल घोडा शिल्प शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहे. वर्षानुवर्षे मोरवाडी चौकाचे नाव बदलून नव्याने त्याची ओळख लाल घोडा चौक म्हणून झाली तर नवल वाटायला नको. याच बरोबर उद्या शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथील कोकणी चौकात रिंग ऑफ लाइफ शिल्प, वाकड जंक्शनचे चित्ता शिल्प व पिंपळे निलख येथील शहीद कामटे उद्यानासमोर हत्तीचे शिल्प बसवण्यात येणार आहे.



