पिंपरी : १० जून १९९९ रोजी फुले,शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी स्थापन झालेल्या आपल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज २३ वर्ष पूर्ण झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या छत्र छायेखाली वाढलेल्या राष्ट्रवादी नावाच्या या छोट्या रोपांचे रूपांतर आज मोठ्या वृक्षामध्ये झाले. पक्ष स्थापनेपासून आदरणीय पवारसाहेबासह अनेक सहकाऱ्यांच्या सोबतीने राष्ट्रवादी मध्ये काम करण्यासाठी नेहमी नवी उमेद मिळत राहली, पुढेही त्याच उमेदीने काम करायचं आहे.
वंचित, सामान्य माणसं, युवक, महिला यांच्या प्रश्नावर अग्रक्रमाने काम करणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी” ला अनेक सहकार्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बळावर २३ वर्ष पूर्ण झाली त्याबाबद्दल सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!




