भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. पण या मागचा नंबर गेम नेमका कसा झाला? कोणाची मते कशी फुटली? ती कोणी फोडली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का असे केले असले तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रत्यक्षातला फटका हा महाविकास आघाडीत नंबर १ असलेला पक्ष शिवसेनेला बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आपल्या कोट्यानुसार ठरलेली मते शिवसेनेच्या उमेदवाराला दिली हे खरे. परंतु, मग प्रश्न उरतो अपक्ष आमदार नेमके फोडले कोणी?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना क्रेडिट मिळालेला हा नंबर गेम नेमका कसा झाला कसा?
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं
संजय राऊत -४१
प्रफुल्ल पटेल -४३-२
ईम्रान प्रतापगढी -४४-३
संजय पवार – ३३
भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते
अनिल बोंडे – ४८
पियुष गोयल – ४८
धनंजय महाडिक – २७
मतांचे समीकरण
संजय पवार यांना मिळालेली मते
३३+२=३४
संजय पवार यांना ३३ मते मिळाली. त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली ४३ मते त्यातील ४१ चा कोटा पूर्ण करत उरलेली २ तर प्रतापगढी यांना मिळालेली ४४ मते त्यातील ४१ चा कोटा पाहता ३मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना ३८ मते मिळाली.
धनंजय महाडिक यांना मिळालेली मते
२७+७+७=४१
धनंजय महाडिक यांना २७तर पियुष गोयल यांना ४८ मते मिळाली त्यातील ४१चा कोटा पूर्ण करत ७ अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही ४८ मते मिळाली त्यातील४१ चा कोटा पूर्ण करत ७अधिक मते मिळाली. २७अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची १४ मते अशी धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. यात महाडिक यांचा विजय झाला आहे.
भाजपचा गेम चेंजर नंबर गेम
भाजपने महाविकास आघाडी समर्थक ६ अपक्ष आमदारांना फोडले आणि त्यांची पहिल्या पसंतीची मते मिळवली. तसेच तटस्थ असलेल्या मनसे १ आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची ३ मते भाजपला दिली. अशी एकूण १० मते भाजपला अतिरिक्त मिळाली. या नंबर गेमने भाजपच्या तीनही उमेदवारांना जिंकून दिले.