मुंबई : मंत्री, आमदारांसमोरच कार्यकर्ते भिडण्याच्या घटना नव्या नाहीत. आता पुन्हा अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशात कॅबिनेट मंत्र्यासमोरच भाजपच्या कार्यकर्त्यांना तुफान राडा केला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. गुरुवारी रात्री ही घटना घडली.
कैबिनेट मंत्री जितिन प्रसाद की मीटिंग में विधायक से भिड़े बीजेपी पदाधिकारी pic.twitter.com/Gz4I9QV2IA
— Mangal Yadav (@MangalyYadav) June 10, 2022
मंत्र्यांसमोरच आमदार आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. मुरादाबादमध्ये ही घटना घडली असून या घटनेवरुन आता चर्चांना उधाण आलंय. उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या उपस्थितीत एक बैठक सुरु होती. या बैठकी दरम्यान जोरदार राडा झाला. भाजप मागासवर्गीय मोर्चाचे कार्यकारीणी सदस्य मनमोहन सैनी यांचा जबर मारहाण यावेळी करण्यात आली. बैठकीत आधी वाद झाला. मग शाब्दिक बाचाबाची वाढली. अखेर परिस्थिती अधिकच चिघळली आणि तुफान राडा झाला.