पिंपरी दि. १३ जून :- आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केले होते. रविवारी रात्री आरोपी हा रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीला धक्काबुक्की करून आरडा – ओरड करत होता. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी कार्यरत आहेत. पोलीस नाईक यांनी आरोपीकडे विचारणा केली असता त्याने त्यांना मारहाण केली. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम हॉस्पिटल येथे घेऊन गेले.
तिथे केस पेपर काढण्यासाठी जात असताना आरोपीने ‘ तू माझ्यावर गुन्हा दाखल केला. तर, मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो ‘ अशी धमकी दिली. शिवीगाळ केली. तुझी विकेटच टाकतो असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर धावून जात मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला.
हा प्रकार रविवारी (दि.१२) रात्री साडेबाराच्या दरम्यान मोशी येथे घडला. पोलीस नाईक बिराप्पा दत्तू बनसोडे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महादेव दत्तात्रय खंडागळे (वय ४०, रा. चांडोली, राजगुरुनगर, खेड) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.




