मुंबई : राज्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हॉटेल पर्यटन करून आठ दिवस संपत नाहीत तोपर्यंत पुन्हा राज्यातील सर्व आमदारांना हा योग जुळून आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हॉटेल पर्यटन मिळणार आहे. यापूर्वीही राज्यातील सत्ता स्थापना दरम्यान महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना हॉटेल पर्यटनाचा आनंद मिळाला होता.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व आमदारांना व काही अपक्ष आमदारांना दोन दिवसीय हॉटेल पर्यटन केले होते. आता विधान परिषद निवडणुकीत पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. १८ जून पासून २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुका पर्यंत सर्वच पक्षातील आमदारांना पुन्हा पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. आमदारांच्या हॉटेल पर्यटनाचा लाईव्ह शो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया राज्यातील सर्व जनतेला दाखवत राहतील यामुळे लोकांचे ही मनोरंजन होईल हे नक्की…



