वाकड परिसर उच्च शिक्षित असल्याचा मनाला जातो. मात्र याच शिकलेल्या नागरिकांनी अशिक्षितासारखे वागल्यास काय होऊ शकते हे पहा. अशा नागरिकांच्या अडाणीपणामुळे वाकडमधील स्मार्ट रस्त्यांवरील वाहूतुक खोळंबण्याचे कारण बनले आहे. बेशिस्त वाहन पार्किंगमुळे केवळ विकेंड नव्हे वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली असून ही डोकेदुखी दूर करण्याची मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
दत्त मंदिर रस्त्यापासून पलीकडचा पट्टा तसा उच्चभ्रू सोसायट्यांनी गजबजलेला परिसर आहे. येथील रहिवाशी देखील उच्चशिक्षित, आयटीयन्स, नोकरदार आहेत मात्र या सर्व उच्चशिक्षितांचा अडाणीपणा, आडमुठेपणा, उद्दामपणा आणि बेशिस्तपणा. वाहतूक तुंबण्यास कारभूत ठरत असून या रस्त्यांवरील हॉटेल्स, स्नॅक्स, टी सेंटर व अन्य व्यवसायिक यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसत असते. तसेच वाकड परिसरातील शाळांना पार्किंग नसल्याने त्यांची याला भर पडते.
या सर्व घटनेमुळे वाकड मधील स्मार्ट रस्ते केवळ नावापुरतेच स्मार्ट उरले आहे. वाहतुक नियमन आणि नियोजनाअभावी येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुट्टी असल्या की प्रत्येक जण आपली मोटार काढतो आणि वाट्टेल तिथे पार्क करतो. या वाहनांच्या बेफिकीरीमुळे पार्किंग फुल्ल होतात. वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. रस्त्यांच्या दुतर्फा सर्रासपणे दुचाकी, चार चाकी वाहने आडवी – तिडवी पार्क केल्याने संपूर्ण रस्ता व्यापला जातो. पादचाऱ्यांना पार्क केलेल्या गाड्यांच्या मधून वाट काढत जीव मुठीत ठेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यातच महापालिकेची जागोजागी सुरू असलेली रस्त्यांची कामे, विविध विक्रेते, व्यावसायिक व पथारी वाल्यांचे बस्तान हे वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. या सततच्या कोंडीने वाकडकर पुरते हैराण झाले आहेत.