पिंपरी चिंचवड, २७ ऑगस्ट २०२५
२०१७ साली अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. पिंपरी प्रभागात काही राजकीय नेत्यांनी महापौर उपमहापौर यासारखी मोठी पदे उपभोगली होती. त्यांच्या विरोधात भाजप पक्षातून पहिल्यांदाच उभे राहत 16,116 अशा विक्रमी मताधिक्यांनी नव्या युवा नेतृत्वाचा उदय झाला. विकासापासून कोसो दूर राहिलेला पिंपरी गावठाण परिसर आणि रुतलेल्या नेतृत्वाला फाटा देत नागरिकांनी संदीप वाघेरे यांच्यासारख्या नवख्या व युवा नेतृत्वाला नागरिकांनी पहिल्यांदाच संधी दिली. एक नव्या, तरुण, धाडसी व लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास दाखवला – ते म्हणजे नगरसेवक संदीप वाघेरे…..
त्यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कार्याची धमक दाखवत त्यांनी प्रभागात शेकडो कामे करत मागील आठ वर्षात विकासाची गंगा आणली आणि सर्वांगीण विकासाचे नवीन पर्व सुरू केले. त्यामुळेच पिंपरी गावाच्या विकासाचा खरा “आधारवड” म्हणून संदीप वाघेरे यांची ओळख निर्माण झाली. मागील आठ वर्षांमध्ये कामाची सुरुवात गावातील ग्रामदैवत काळभैरव मंदिर जीर्णोद्धार, सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून केली. त्याचबरोबर अनेक उल्लेखनीय कामे सांगता येतील.
धार्मिक व सांस्कृतिक कामे :
- ग्रामदैवत काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार
- छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
- पिंपरी गावातील महालक्ष्मी व शितळादेवी मंदिराचा स्वखर्चातून जीर्णोद्धार
- जिजामाता रुग्णालयात जिजाऊ मासाहेब व बालशिवाजी यांचा पुतळा भेट
- स्वखर्चातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे ब्रॉन्झचे अर्धपुतळे महापालिकेला भेट
भव्य विकास प्रकल्प :
- मिलिटरी हद्दीतून जाणारा डेअरी फार्म उड्डाणपूल
- पवना नदीवरील समांतर उड्डाणपूल (पिंपळे सौदागर–पिंपरी गाव जोडणी)
- जिजामाता रुग्णालय उभारणीसाठी यशस्वी पाठपुरावा
- कै. हरीभाऊ दिनाजी वाघेरे उद्यान, महात्मा फुले क्रीडा संकुल
- ७ एकर आरक्षित जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल
- नवमहाराष्ट्र विद्यालयात अद्यावत प्रकाश व्यवस्था व क्रीडांगण सुधारणा
- देवधर हॉस्पिटल जवळ २० दशलक्ष व नवमहाराष्ट्र विद्यालयात १० दशलक्ष क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या
सामाजिक व शैक्षणिक उपक्रम :
- मागील १२ वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शालेय साहित्य वाटप
- महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम
- वारकरी संप्रदाय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील सक्रीय सहभाग
- दरवर्षी दहीहंडी व रावण दहन उत्सवाचे आयोजन
- तरुणांसाठी रोजगार मेळावे, रक्तदान शिबिरे
सुरक्षा व पायाभूत सुविधा :
- संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे
- सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण
- गटारींचे आधुनिकीकरण, स्मशानभूमी सुधारणा
- वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनतळ उभारणी
- कचरा संकलन केंद्र उभारणी
- चिल्ड्रन्स प्लेग्राउंड, व्यायामशाळांचे आधुनिकीकरण, स्विमिंग पूल नूतनीकरण
पर्यावरण व आरोग्यसेवा :
- मिलिटरी डेअरी फार्म येथे ३५ हजार झाडांची लागवड
- पवना नदी सुधार प्रकल्प व जलपर्णी निर्मूलन
- जागतिक महामारी काळात ७३ लाखांची वैद्यकीय उपकरणे भेट
- प्रभागात वॉटर प्युरिफाय भेट देणे
सामाजिक बांधिलकी :
- वृद्धाश्रमांना मदत
- खेळाडूंना दत्तक घेणे
- सामाजिक व सांस्कृतिक संस्थांना पाठबळ
- आयुष्यमान भारत व ई-श्रम कार्ड वाटप
माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग यासाठी पुढाकार घेऊन स्वतः मैदानात उतरले, अनेक महिलांना सोबत घेऊन महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम राबवले. ७ एकर आरक्षित जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीसाठी पाठपुरावा, प्रभागातील प्रत्येक रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटचे काँक्रिटीकरण, तुंबणारे गटारी अद्यावत करून घेतली, प्रभागातील नदी लगत असणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात संरक्षण देण्यासाठी रात्री अप्रतिम स्वतः मदतीला धावून जात माणुसकी जपताना दिसतात. प्रभागातील सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एसआरए प्रकल्प राबवून झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देण्याचे मोठे काम त्यांनी केले.
मिलिटरी डेअरी फार्म येथे 35 हजार झाडांची लागवड, जागतिक महामारी काळात जनतेसाठी स्व:खर्चातून 73 लाखाची वैद्यकीय उपकरणे भेट यामध्ये 50 फावलर , चार व्हेंटिलेटर, २ हाय फ्लो भेट दिले. प्रभागातील व्यायाम शाळांचे आधुनिकीकरण, खेळाडूंना दत्तक घेणे, वृद्धाश्रमाला मदत करणे, प्रभागात सुलभ शौचालय उभारणी, स्विमिंग पूल चे नूतनीकरण, प्रभागात वॉटर प्युरिफाय भेट, सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, वारकरी संप्रदाय, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग घेताना दिसतात.
प्रचंड इच्छाशक्ती असणारे नेतृत्व, धाडसी व विशाल अंतकरण असणारे जनसामान्यांचे नेतृत्व संदीप वाघेरे यांचा वाढदिवस म्हणजे लहान मुलापासून आबाल वृद्धापर्यंत सर्वांना गवसणी घालणारे नेतृत्वाचा उत्सव सामान्य जनता साजरा करत असते. ज्यांनी लहानपणापासून दुग्ध व्यवसायातून सुरुवात करत आज नामवंत बांधकाम व्यावसायिक व सामाजिक बांधिलकी जपणारे विकासाचा आधारवड म्हणून पहिल्याच निवडणुकीत प्रभागात विकासाची गंगा आणणारे उमदे नेतृत्व, प्रखर इच्छाशक्ती, धाडसी व विशाल अंत:करण असणाऱ्या सामान्य जनतेचा आधारवड नगरसेवक संदीप वाघेरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!