पिंपळे सौदागर, २८ ऑगस्ट
रहाटणी परिसरातील अंबिका कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, वेणाई कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, आझाद कॉलनी आणि जय भवानी चौक या भागांत सतत वीज खंडीत होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार वीज खंडीत होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासाठी माजी नगरसेवक सागर खंडूशेठ कोकणे यांनी पुढाकार घेत MSEB च्या असिस्टंट इंजिनियर मराविमंडळ (पिंपळे सौदागर) यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी परिसरात वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय होत आहे. परिसरातील वीज भारानुसार योग्य केबल टाकून आणि वीज पुरवठा व्यवस्थापन शिस्तबद्ध करून कायमस्वरूपी उपाय करावा. यामुळे रहाटणी परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा सागर कोकणे यांनी व्यक्त केली.