वाकड (वार्ताहर) वाकड येथील भुजबळ चौकात पुण्यातील एका ठेकेदाराने स्ट्रॉंम वॉटर पाईपलाईनचे काम केले. मात्र, खोदलेल्या रस्त्यावरती कोणतेही दुरुस्ती केलेला नाही. उलट या ठिकाणी निघणारे सर्व मातीचा ढिगारा मुख्य चौकात आणून टाकला आहे. त्याही पुढे जाऊन अर्धवट ठेवलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी मोजमाप करताना ठेकेदाराची व महापालिकेची लोक दिसत होती. यावरून महापालिका प्रशासनाला जनतेपेक्षा ठेकेदाराचे जनहित जास्त महत्त्वाचे असल्याचे निदर्शनास येते.
मुंबई पुणे महामार्ग लगत वाकड ते किवळे दोन्ही बाजूच्या सर्विस रस्ता रुंदीकरण करण्याचे राज्य सरकारने ठरवले असून महापालिकेने या भागातील अतिक्रमणे काढली आहे. वाकड येथे स्ट्रॉमवॉटर पाइप लाइन टाकण्याच्या कामामुळे संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात रोज अडकत आहे. या कामात पालिका आणि ठेकेदार यांचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारा ठरत आहे. ठेकेदारांनी खोदलेल्या रस्त्याची माती सर्व रस्त्यावरती पसरलेली आहे.
भुजबळ चौकात महिनाभरापासून चालू असलेल्या स्ट्रॉमवॉटर पाइप लाइनच्या कामामुळे रस्ते खोदून ठेवले होते या विरोधात आवाज उठवल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली मात्र सर्व मातीचा ढिगारा मुख्य चौकात आणून टाकून दिला आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी हा रस्ता चिखलमय होतो. सर्वत्र राडारोड्याचे साम्राज्य तर होतेच चेंबरसाठी खोदलेले खड्डे अद्याप सुस्थितीत मोजवले नाहीत. आणि त्यापुढे जात ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी झालेल्या कामाचे मोजमाप करताना दिसत आहेत. एकीकडे जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी उपयोगात येत नाही तर केवळ ठेकेदारांकडून टक्केवारी मिळवण्यासाठी पालिकेचे अधिकारी तत्परता दाखवतात.
हा अत्यंत वर्दळीचा चौक असल्याने दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याठिकाणी काम करणारा ठेकेदार पुण्यातील असल्याने वाहतूक कोंडी, चिखलमय रस्ता व वाहनांचे होणारे अपघात याचे गांभीर्य नाही आणि महापालिका प्रशासनही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्याही पुढे जाऊन ठेकेदाराची बिल काढण्यासाठी चिखलातील रस्त्यावरती मोजमाप करताना पालिकेचे कर्मचारी दिसून येतात. शेतकरीच चोराला उचलून लागत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केले जात आहेत.