निगडी : पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांनी आयोजित केलेल्या संत तुकाराम महाराज दिंडी सोहळ्यानिमित्त 21 किलो चांदीचे सिंहासन व अभिषेक पात्र अर्पण केले. त्यानिमित्त आकुर्डी येथून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष सौ. कविताताई आल्हाट, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, वैशाली काळभोर यांच्यासह वारकरी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
https://fb.watch/dJe9iz5xuP/




