देहूगाव,दि.२० ( वार्ताहर) तीर्थक्षेत्र देहू येथील पालखी सोहळ्यातील भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासनासह सेवाभावी संस्था सरसावले होते. गत दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे पालखी सोहळा न करता आल्याने चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या वारकरी यंदा पंढरीच्या वारीसाठी अतुरलेला दिसून आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता पाणीपुरवठा, महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा खंडित होण्याची दक्षता घेण्यात येत होते. ठीक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती तर पोलिस बंदोबस्त तैनात होता.
गेली आठवडया भरांपासुन राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या ,वारकऱ्यांसह भाविकाचे देहूत आगमन होत होते.ठिक ठिकाणी होणाऱ्या सप्ताह ,हरिनाम,भजन किर्तनामुळे भक्तीमय वातावरण झाले होते .सोमवारी म्हणजे पालखी प्रस्थान दिनी पहाटे पासूनच भाविकांचा ओघ मंदिराकडे फिरकला होता .गगनात सकाळ पासून ढगांनी आच्छादन घेतले होते. अधून मधून पावसाच्या सरी बरसत होत्या . या पावसाच्या बरसणाऱ्या सरीनी वारकऱ्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. दर्शनार्थ लागलेल्या रांगा लांब पर्यंत लागल्या होत्या.
गावातील ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था आणि तसेच सेवाभावी प्रति वर्ष महाप्रसादाचे वाटप करणारे अन्नदान मंडळ भाविक वारकऱ्यांची सेवा पुरवण्यात मग्न होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये संत तुकाराम अन्नदान मंडळाकडून गेली 28 वर्षे वारकऱ्यांना महाप्रसाद वाटपाने सेवा करण्यात येत आहे. ब्रिगेडियर जी.एस रावत ,लेफ्टनंट कर्नल भूपेंद्र सागी, पीएमपीएमएलचे माजी चेअरमन सुरेश चिंचवडे,उद्योजक गणेश घुले,राजु घुले यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता अन्नदान वाटप करीत प्रारंभ करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार रोहित पवार,सुनिल शेळके उद्योजक मिलिंद पन्हाळकर,बीपीन मेहता,दिशा सोशल फाउंडेशनचे बाळासाहेब जवळकर,सचिन साठे आदींनी अन्नदान मंडळाला भेट देत अन्नदान करून सेवा पुरवण्याचा लाभ घेतला.
समर्थ मित्र मंडळ जगदंब मित्र मंडळ दिल दोस्ती मित्र परिवार देऊ ट्रेकर्स यांच्यावतीने गत पाच वर्षांपासून धर्मवीर संभाजी चौकामध्ये अन्नदानाचे आयोजन विशाल परदेशी सोमनाथ चव्हाण,निलेश मोरे,सचिन कुंभार,सागर गायकवाड,चंद्रकांत भोसले,नंदराज पांडे यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.मुख्य मंदिराजवळील महाद्वार चौकामध्ये श्रीमंत नवशा अन्नदान मंडळ आणि डॉ आंबेडकर चौकामध्ये दक्षिणमुखी काळा मारुती अन्नदान मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा वाटपाने भावीक वारकऱ्यांची सेवा करीत होते. ब्रिगेडियर जी.एस रावत ,लेफ्टनंट कर्नल भूपेंद्र सागी यांच्या हस्ते अन्नदान वाटपाने संत तुकाराम अन्नदान मंडळाचे अन्नदान प्रारंभ करताना




