पिंपरी : रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी (२३ जून) शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरूवारी सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकेल. मात्र, सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. दुरूस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवारी (२४ जून) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.




