महाराष्ट्र माझा, २१ जून
आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.
याच योगा दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार २१ जून रोजी न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयात ‘जागतिक योगा दिनानिमित्त’ योगा दिवस साजरा केला. यावेळी 526 विद्यार्थी, 18 शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व 12 पालक यांनी सहभाग घेतला. यावेळी विविध योगासने करून उत्साहात योग दिन साजरा केला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. पवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. योग शिक्षिका सौ. पवार मॅडम व योगाभ्यासक व्ही. एस. जाधव यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके करून दाखविली व विद्यार्थ्यांना करण्यास प्रोत्साहित केले.




