मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे 11 आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवून दबावाचे राजकारण करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकारून पक्षात कुणीही बंड करू शकणार नाही. कुणाही पुढे पक्ष झुकणार नाही हे दाखवून दिलं आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे ऐवजी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच कमांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.



