पिंपळे सौदागर : रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका सौ शितलताई नाना काटे व नाना काटे सोशल फाउंडेशन तसेच “द आर्ट ऑफ लिविंग” यांच्या वतीने महानगरपालिकेचे कै.बाळासाहेब कुंजीर मैदान येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून “योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद, विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी असे आवाहन नाना काटे यांनी केले.
या शिबिरास पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, युवक युवती, विविध सोसायटी मधील सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




