तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी संदीप गाडेकर) इंद्रायणी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक सुरेश थरकुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विद्याशाखेचे अंतर्गत शारीरिक शिक्षण विषयात आपला शोधप्रबंध सादर केला.
“ए कंप्यारेटिव्ह स्टडी ऑफ क्ले कोर्ट अँड मॅट कोर्ट विथ रिस्पेक्ट टू पर्सेप्शन अँड स्कील इफेक्टिवनेस ऑफ गेम खो-खो” या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
आताच्या काळात विविध भारतीय खेळ नैसर्गिक मैदानावरून कृत्रिम मैदानावर खेळले जात आहेत. याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर, कौशल्यांवर, शारीरिक क्षमतेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्याचबरोबर खो-खो खेळातील कौशल्यांचा यशस्वितेचा दर वाढविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तसेच सूचना शोध प्रबंधात मांडण्यात आल्या आहेत. त्यांना चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांचे मार्गदर्शन लाभले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, सर्व नियामक मंडळ सदस्य, प्राचार्य डॉ. एस के मलघे व प्राध्यापक वर्ग यांच्याकडून डॉ. सुरेश थरकुडे यांचे कौतुक होत आहे.




