पुणे (प्रतिनिधी) संदीप गाडेकर : आगामी काळामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल तसेच शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके, थकित फरक प्रकरणे, थकीत पेन्शन प्रकरणे, अनुकंपा मान्यता, पदोन्नती, टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्या बाबतचे सूतोवाच पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे मॅडम यांनी केले. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा टीडीएफ व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या वतीने. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधिकाऱ्यांसोबत सविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सौ. सुनंदा वाखारे मॅडम बोलत होत्या.
यावेळी शहर विभाग वेतन पथकाच्या अधीक्षक सौ.सरदार मॅडम यांनी थकीत बिलापोटी साठ कोटी, वैद्यकीय बिलापोटी सात कोटीची मागणी राज्य शासनाकडून केली असून लवकरच या निधीची पूर्तता झाल्यानंतर दोन ते तीन वर्षापासूनची थकीत सर्व बिले निकाली काढली जातील असे आश्वासन दिले. संचालक कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा व पत्रव्यवहार केलेला आहे असे वाखारे मॅडम यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वेतनेतर अनुदान शाळांच्या खात्यावर जमा होणार असून शाळांनी वेतन देयके फॉरवर्ड केल्यानंतर हार्ड कॉपी वेतन पथक कार्यालयाकडे जमा करावी ती जमा न केल्यामुळे वेतनास उशीर होत असल्याचे सरदार मॅडम यांनी स्पष्ट केले. तसेच वेतन एक तारखेला होण्याबाबत सर्व शाळांनी सहकार्य करावे व सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण करावी असेही सांगण्यात आले.
यावेळी राज्य टीडीएफ चे चे कार्याध्यक्ष मा. जी.के. थोरात सर व विश्वस्त मा.के.एस. ढोमसे सर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत शिक्षणाधिकारी व वेतन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर विविध समस्या वर चर्चा करून शिक्षकांची अडवणूक न करता शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा तसेच शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत असे आवाहन जी.के. थोरात सर यांनी केले. तसेच तीन महिन्यातून एकदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या साठी व त्या सोडवण्यासाठी सहविचार सभा घेण्याचे अधिकाऱ्यांना आव्हान केले.
भविष्य काळामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी संवाद दिनाचे आयोजन केले जाणार असल्याचे वाखारे मॅडम यांनी सांगितले. यावेळी शिक्षकांनी आपल्या समस्या 15 दिवस आधी ई-मेल करून कार्यालयाला कळवाव्यात व महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी संवाद दिनाला उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन केले. एकूणच सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत व प्रलंबित प्रश्नाबाबत योग्य ती माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबतचे आश्वासन सर्वांनी दिले.
यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक सौ. शिंपी मॅडम शहर अधीक्षक सौ. सरदार मॅडम पुणे जिल्हा परिषदेचे लिपिक पाटील सर उपस्थित होते. वैयक्तिक स्वरूपाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांची यादी बनवून संबंधीच्या विभागांना दिलेले असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व समस्या सोडवल्या जातील असे सर्व विभागाकडून सांगण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले , सचिव पंकज घोलप, जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय आरकडे, सचिव राजेंद्र पडवळ, कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, उपाध्यक्ष सोमनाथ भंडारे, अशोक नाळे बारामती तालुका माध्यमिक अध्यक्ष किशोर दरेकर, पुणे शहर टीडीएफ चे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, पुणे जिल्हा माध्यमिक महिला अध्यक्षा स्वाती उपार, उपाध्यक्ष स्नेहल बाळसराफ, पुणे जिल्हा महिला शिक्षिका संघाच्या कार्याध्यक्षा सौ. सविता ताजणे प्रतिनिधी सौ.मीरा डुंबरे, मावळ महिला अध्यक्षा सौ बारबोले, आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा सौ. शिंदे, राजेंद्र सुतार जिल्हा प्रतिनिधी माने सर, मावळ तालुका अध्यक्ष राधाकृष्ण येणारे, प्रवीणकुमार हुलावळे, राज मुजावर, सुनील गिरमे, दिलीप पापळ व जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन, जिल्ह्यातील सर्व समस्यांचे संकलन, सचिव पंकज घोलप यांनी केले. शेवटी वसंतराव ताकवले यांनी शिक्षणअधिकारी सुनंदा वाखारे तसेच वेतन पथकाचे संघटनेच्या सहकार्याबद्दल अभिनंदन करून आभार मानले.




