पिंपरी : राज्यातील सत्तेतील शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष सुरू असताना शिवसेना उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदे यांची असा सतत संघर्ष घडत आहे. राज्यात सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ निदर्शने होत असताना शिंदे गटाकडून ही कल्याण, डोंबिवली, पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील नगरसेवकांना आपल्याकडे खेचत मन वळवणे करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील ते बंडखोर नगरसेवक कोण याची चर्चा जोर धरला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेचे ९ नगरसेवक आहेत. यामधील चिंचवड येथील नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी यापूर्वीच भाजपचा रस्ता धरला आहे. तर उर्वरित राहुल कलाटे, निलेश बारणे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शले, मीनल यादव व अमित गावडे हे शिवसेनेचे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यामधील कोणते नगरसेवक बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जातात याची चर्चा सुरू झाल्या आहेत.

आज चाफेकर चौक चिंचवड येथे शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात अनेक शिवसैनिकांनी सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी २०१७ ते २२ मध्ये महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या निवडक नगरसेवकांची उपस्थिती होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या लोकप्रतिनिधी बरोबर नगरसेवकांच्या बाबत सामान्य शिवसैनिकांच्या मनात रोष निर्माण होऊ लागला आहे.



