चिखली : भोसरी विधानसभा मतदारसंघातून प्रभाग क्रमांक 13 मधील मोरेवस्ती, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, शाखाच्या वतीने साने चौकात, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन आयोजित केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी जमा होऊन, मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुखांना पाठिंबा देण्यात आला. गद्दार एकनाथ शिंदे व त्याचे फुटीर आमदार यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना म्होरक्या व फुटीर 40 चोर आमदारांना संबोधण्यात आलेे. तसेच “मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है!” घोषणांनी चिखली परिसर दुमदुमून गेला,
यावेळी सौ साधनाताई काशिद यांच्या बरोबर अनेक महीलाही उपस्थित होत्या, भोसरी विधानसभा संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, उपजिल्हा प्रमुख निलेशजी मुटके,, उप शहरप्रमुख अनिल सोमवंशी, शहर संघटक रावसाहेब चंद्रकांत थोरात, उप शहरप्रमुख नेताजी काशिद, जिल्हा समन्वयक राहुल भोसले, साधनाताई काशिद, दादा नरळे, संजय गाढवे, युवराज कोकाटे, प्रविण पाटील, हरिभाऊ लोहकरे, दादा ठाकरे, यांनी मनोगत व्यक्त केले. संघटक रावसाहेब चंद्रकांत थोरात यांनी येणाऱ्या आषाडी एकादशीला पुजा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व सौ रशमीताई ठाकरे करतील अशी पांडुरंगाची ईच्छा आहे असे सांगितले,
यावेळी शैलेश मोरे, ऋषींकेश जाधव, सुजित साळवी, अशोक गायकवाड,चंद्रकांत जाधव, विजय शिवपुजे, गोविंद गोरडे,वैभव छाजेड,अनंत मते, आनद हिंगे, सुर्यकांत देशमुख, सुखदेव देवकर, विलास टकले, संदिप आखाडे,चेतन सावंत, संतोष गावडे, वैभव जाधव,संगमेश्वर मुळे, वैभव थोरात, सुमंत तांबे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख सतिश डिसले यांनी केले, व श्री सर्जेराव (आबा) भोसले यांनी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.




