कार्ला– जून महिना सुरु असून पावसाचे आगमन मावळात झाले या आंदाजाने वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी कार्ला परिसरात असणाऱ्या भाजे लेणी,कार्ला लेणी,एकविरा देवी मंदिर,लोहगड किल्ला,विसापूर किल्ला,भाजे येथील पर्यटनस्थळावर पर्यटकांनी गर्दी होती. परंतु पाऊस नसल्याने पर्यटकांची नाराजी चेहऱ्यावर दिसत होती.

तसेच भाजे येथील सुप्रसिद्ध धबधब्याला पाणी नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. भाजे धबधब्यावर वर्षाविहाराचा आनंद घेता न आल्याने पर्यटक भाजे लेणी,व लोहगड विसापूर किल्याकडे आपला मोर्चा वळवला होता. भाजे लेणी लोहगड विसापूर किल्ले पर्यटकांनी फुलून गेली होते तर लोहगड विसापूर किल्याकडे जाणाऱ्या मार्गावर देखील पर्यटकांची व वाहनांची देखील गर्दी झाली होती.



