देहूरोड,दि.२४ ( वार्ताहर ) किवळे येथील सिटीवन स्कायवी बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षिततेची साधने व उपाययोजना न पुरविता मजुरांकडून काम करून घेताना झालेल्या अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याप्रकरणी प्रकल्प संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाविकास समितीच्या वतीने सोलोमनराज भंडारे यांनी रावेत पोलीस चौकी मध्ये निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस व किवळे येथे सिटीवन स्कायवी बांधकाम प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची साधने न देता आणि कोणतीही उपाययोजना न करता फुटिंगचे काम करत असताना शनिवारी ( दि.११ ) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास माती व दगडाची दरड कोसळून संदीप कोलाय बनसिंग ( वय २०,मुळ रा.कुडवा ,ठाणा सोनवा जि.पश्चिमी सिंधभुमह.सध्या रा.मुकाई चौक रावेत) याचा श्वास गुदमरुन मयत झाला असुन बुध्देश्वर, करण आणि मंगल हे तिघे मातीचे व दगडाचे दरडीखाली गाडले जावुन गंभीर जखमी झाले आहेत.
सदर ठिकाणी दुर्लक्ष आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केल्याने बांधकाम प्रकल्पाच्या संचालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मयत मजूर व गंभीर जखमींना न्याय मिळावा अन्यथा महा विकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.




