पिंपरी दि. २५ जून :- महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी व डुडुळगाव येथे येथे करण्यात आली.
पिंपरीतील कारवाईत सुभाष प्रयाग जाधव (वय २२, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ- झारखंड), जय ठकसेन लांडगे (वय २४, रा. पारखे वस्ती, हिंजवडी, मूळ-बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर राहुल माने (वय ३७) याच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी दोन महिलांना वेश्याव्यवसासाठी प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली. ही कारवाई पिंपरीतील डीलक्स मॉलच्या पाचव्या मजल्यावरील इलाईट स्पा सेंटर येथे करण्यात आली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तर दुसरी कारवाई डुडुळगाव येथे झाली. यामध्ये दिनेश अन्नू पुजारी (वय ४१, रा. आळंदी-मोशी रोड, डुडुळगाव, मूळ-कर्नाटक) व लॉजचा चालक व मालक सूरज प्रेम तमांग (वय २९, दोघेही रा. आळंदी-मोशी रोड, डुडुळगाव) यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपींनी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.




