पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नवी दिशा प्रकल्प सुरु करण्यात आला असून त्याद्वारे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी महिला बचत गटांना विविध काम देण्यात येत आहे. त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम आज ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन बचत गटांना देण्यात आले. या कामाचा कार्यादेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते संबंधित बचत गटांना देण्यात आला.
दापोडी येथील आनंदवन वसाहत येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, माजी नगरसदस्य राजेंद्र काटे, माजी स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, समूह संघटिका वैशाली लगाडे, वीणा तिटकारे, महाराष्ट्र कुष्ठपिडीत संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, आनंदवन वसाहतीचे पंच दिपक धोत्रे, प्रतिनिधी सुरेखा दोडमणी, सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, रवी कांबळे, विक्रम नाणेकर, राधा संगीत, राजेश दुधाळ, तुषार दोडमणी, बचत गटांच्या प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.




