पवनानगर : ठाकुरसाई गावातील पवना धरणासाठी संपादन झाल्यावर काही नागरिकांनी काठावर राहणे पसंत केले तर काही नागरिक कामाच्या निमित्ताने बाहेर गेले. आज ५७ वर्षेपुर्वी आपले नातेवाईक या ठिकाणी रहिले त्याच बालपण ज्या ठिकाणी गेले अशा भागाची पाहणी गावातील नागरिकांनी केली.
पवना धरणासाठी जमीन संपादित केलेल्या सुमारे ८६३ जणांचे अजून पुनर्वसन झालेच नाही. या दुःखाने अनेक वर्षे होरपळत असलेल्या या गावकऱ्यांनी आपले वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले ठाकूरसाई गावाच्या अवशेषाची पाहणी केली. पवना धरणातील पाणीसाठ्यासाठी संपादित केलेल्या जुने ठाकुरसाई जुन्या काळच्या आठवणींनी ज्येष्ठ नागरिक, महिलांचे डोळे पाणावले आपल्या मुलाबाळांसह हे सर्व जण जुन्या आठवणीत रमले.
गावठाणाचे अवशेष आता पाणीसाठा कमी झाल्यामुळे दिसत आहेत.. धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. पवना धरण वेळी संपादित करण्यात आलेल्या गावांपैकी ठाकूरसाई हे गाव. ५५ ते ६० घरे असलेले छोटे गाव पवना गावात गेले. गावठाणातील मंदिर, शाळा, धरण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त झाले. पिठगिरणीचे ढासळलेले बांधकाम दिसत हे गाव धरणाच्या काठावरच वसलेले आहे. मंदिरातील मूर्ती स्पष्ट दिसत आहे. असल्याने १९७२ सालापासून पाणीसाठा तिसरी पिढी न्यायासाठी लढत आहे. साठवण करण्यास सुरुवात झाली आणि शासनाने धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवावा गाव पाण्यात गेले. काहींचे बालपण या अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
शासकीय आकडेवारीनुसार १२०३ खातेदार प्रकल्पामध्ये बाधित झाले आहेत. ३४० खातेदारांना प्रत्येकी ४ एकर जमीन देऊन शासनाने पुनर्वसन केले आहे. उर्वरित खातेदार पुनर्वसनाचे प्रतीक्षेत आहेत. युती शासनाच्या काळात १९९५ ते १९९९ दरम्यान संपादित केलेल्या जमिनीपैकी ३२८ एकर जमीन पुनः अनुदानित केली आहे. या ठिकाणी धनदांडग्यांनी बंगले बांधले आहेत. मात्र गावकरी मात्र वंचित राहिले आहेत.




