वडगाव मावळ : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचे अपहरण करून तलवार व दगड लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार मावळ ते मुळशी हद्दीत बुधवार (दि २९) ते गुरूवार (दि ३०) घडला.
याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शांताराम भेगडे (वय २९ रा इंद्रायणी कॉलनी कुसगाव रोड कामशेत ता मावळ जि. पुणे) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजु सोपान आंद्रे (रा नाणे ता. मावळ) तसेच अनोळखी चौघांवर (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार प्रशांत भेगडे यांचे आरोपी राजू आंद्रे यांच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आरोपी राजू आंद्रे व त्याचे ४ साथीदारांनी संगनमताने फिर्यादी भेगडे यांना जेजुरीचे भाडे आहे. ते ठरवायचे आहे खोटे सांगुन फिर्यादी भेगडे यांस कान्हे ते टाकवे बुद्रुक रोडवरील जांभुळ फाटा येथे बोलावून घेतले. फिर्यादी भेगडे यांचा खून करण्याच्या उद्देशाने एका कार मधून अपहारण करून भेगडे यांना कुसुगाव प. मा. येथील एका डोंगरावर नेऊन फिर्यादी भेगडे यांची कपडे काढून त्याचे पायावर, पाठीवर, छातीवर दगडाने मारहाण करून पोटामध्ये लाथा मारून राजू आंद्रे याने तलवारीने डोक्यात डावे बाजुस वार केेले. यात फिर्यादी भेगडे यांना गंभीर दुखापत करून फिर्यादी भेगडे मयत झाला आहे असे समजुन त्यास ताम्हनी घाट (ता. मुळशी जि. पुणे ) येथील खोल दरीत टाकून देण्यासाठी कारमधून घेऊन जाऊन पिपंरी (ता. मुळशी जि. पुणे) येथील एका खोल दरीत टाकून देण्याचा प्रयत्न करून फिर्यादी भेगडे याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
भेगडे यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून याबाबत पुढील तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास सस्ते करीत आहे




