पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच भव्य नऊवारी साडी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये प्रथमच नऊवारी साड्या घालून भव्य फॅशन शोचे आयोजन चिंचवडमध्ये शनिवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीला साजेसा असा नऊवारी साज व त्यासोबत पुरूष आयकॉन (ट्रॅडिशनल कपडे) या स्पर्धेत लहान मुलं मुली देखील सहभागी होणार आहेत. या सर्व स्पर्धा चार गटांमध्ये होत असून मिस मिसेस मिस्टर किड्स या गटात स्पर्धेमध्ये 100 हून स्पर्धेक पिंपरी-चिंचवड शहरातून सहभागी झालेले आहे.
या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना सोन्याची नथ व सोन्याचे ब्रेसलेट पैठणी साड्या, क्राऊन, ट्रॉफी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक म्हणून सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना एक ग्रॅम सोन्याची नथ व विविध गिफ्ट हॅम्पर बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. तसेच या स्पर्धेचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय लावणी सम्राट किरण कोरे यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रमाची मेजवानी आहे.




