मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून निशाणा साधण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या एकनाथ शिंदेच्या अभिनंदनाच्या भाषणावरुन सामना अग्रलेखाद्वारे टीका करण्यात आली आहे. मी पुन्हा येईन, यावरुन माझी टिंगल करण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना त्यांनी मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असं विधान त्यांनी केलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान गंमतीचं आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलंय. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल, अशा शब्दांत फडणवीसांना सामनातून टोला लगावण्यात आला आहे. बुधवारी एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले. या चाचणीत त्यांचा विजय झाला. 164 मतं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने पडली. त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर सभागृहातील नेत्यांनी भाषणं केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा आलो’ असा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला होता.
काय म्हटले आहे सामना दैनिकाच्या अग्रलेखात….
शिंदे ह किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. विधानसभेत भाजप व शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला. हे चोरलेले बहुमत आहे. हा काही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विश्वास नाही. शिंदे गटावर विश्वास व्यक्त करताना भाजप आमदारांची डोकीही अस्वस्थ झाली असतील. फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहन्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष से आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या बसले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये.
तुम्ही संपाल, पण शिवसेना संपणार नाही..!
शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही, असाही सणसणीत टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला


