देहूगाव (वार्ताहर) देहूगाव इंद्रायणी नदीतील वसंत बंधाऱ्याला असलेले लोखंडी प्लेटा न काढल्याने नदी पात्रात पाण्याचा फुगटा वाढला आहे. पाण्याच्या वाढलेल्या फुगवटा यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.
खालुम्ब्रे व देहूगाव दरम्यान इंद्रायणी नदीवर वसंत बंधारा आहे. गेली आठ दिवस मावळ तालुक्यात सतत धार पाऊस सुरू आहे. धरणातून पाणी सोडले नसले तरी पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे . इंग्रजी नदीतील वसंत बंधाऱ्या ला असलेले लोखंडी प्लेटा काढण्यात आलेले नसल्याने नदीपात्रात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे.
मावळातील नदीमध्ये असणाऱ्या जलपर्णी पाण्यासोबत येत असल्याने बंधारा जवळ जलपर्णी ही मोठ्या प्रमाणात साचलेली आहे ही जलपर्णी पाण्यासोबत शेतकऱ्यांच्या शेतातही पसरत आहे. त्यामुळे शेत पिकाचे नुकसानही होत आहे या संदर्भात मोशी शाखेतील पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता अचानक पाणी वाढले आहे त्या कामासाठी असणारी कामाची प्रक्रिया सुरू असून दोन-तीन दिवसात लोखंडी प्लेटा काढण्यात येतील.




