देहूरोड ( वार्ताहर ) देहूरोड सेंट्रल चौका जवळ घोराडेश्वर डोंगरावरून येणाऱ्या पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्ग क्र ४. मुंबई पुणे महामार्गावर साचल्याने शनिवारी ( दि.९ ) सकाळ पासूनच तासंन तास वाहतूक कोंडी झाली होती. भर पावसात वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत होती.

देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ मृगन टेम्पल तसेच घोरवडेश्वर डोंगर आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाची सतत धार सुरू आहे. शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या स्तर पावसामुळे घोरावडेश्वर डोंगरावरून तसेच परिसरातून येणाऱ्या पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्ग क्र ४. मुंबई पुणे महामार्गावर साचल्याने महामार्गावर तळ्याचे स्वरूप आले होते. या रात्रीला पाण्यातून वाहनांना मार्ग काढताना हळूहळू वाहने चालवताना पुण्याकडून मुंबईकडे जाणारा मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे रस्त्यावरील पाणी जोरदार उंच उडत होते.
अधून मधून दोन ते तीन किलोमीटर लांब पर्यत वाहनांच्या रांगा लागत असल्याने परिसरातील चौका मध्ये ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पावसात उभे राहून वाहतूक कोंडी सुरळीत करताना पोलिसांची मात्र दमछाक होत होती.




