तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी- डॉ. संदीप गाडेकर) तळेगाव येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये दिनांक 2 जुलै 2022 रोजी अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमदार श्री.कृष्ण रावजी भेगडे मावळ विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन ,तसेच झेरॉक्स मशीन प्रदान व s.s.c. बोर्ड परीक्षा 2022 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा त्रिवेणी संगम असणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार शालेय समिती सदस्य अशोक काळोखे ,आनंद भेगडे प्रतिष्ठानच्या संचालिका सौ.राजश्री राजेश म्हस्के,संचालक ॲड.पेठकर साहेब, सुखेंदू कुलकर्णी , प्रशांत भागवत ,वसंत पवार ,प्रकाश शिंदे उपस्थित होते .करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री .प्रा. डॉ.प्रमोदजी बोराडे उपस्थित होते,
त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर असणाऱ्या करिअरच्या अनेक शाखाची ओळख करून दिली. कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवताना अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असा संदेश दिला. श्री.नंदकुमार शेलार साहेब यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .यानंतर एस.एस.सी. बोर्ड 2022 मध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला .तसेच मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,सर्व शिक्षक वृंद , लिपिक ,कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला सौ. राजश्री ताई म्हस्के .यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन चे प्रदान करण्यात आले.
प्रमुख व्याख्यातांचा परिचय मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग कापरे यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी श्रीमती. भेगडे दुर्गा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गुंड वर्षाराणी व सौ. कोयते वैशाली यांनी केले.




