पिंपरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ तालुक्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर काल दिवसभर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
पवना परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते ठिकठिकाणी रस्ते खुले आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागल्यामुळे रविवार असल्यामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाऊस लांबल्यामुळे भातलावणी ही रखडली होती. त्यामुळे बळीराजा पावसाची वाट पाहत होता परंतु तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार संततधार पावसामुळे भात लावणीला ही वेग आला आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात २९. ४३ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात या परिसरात १२५ मिमी पाऊस झाला आहे. धरणात २९.४३ टक्के ईतका पाणीसाठा आहे
१ जूनपासून धरण क्षेत्रात ६८० मिली मीटर पावसाची नोंद झाली. मागील वर्षी आजमितीला धरणात ३४ टक्के पाणीसाठा होता. व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरुचं आहे




