वडगांव मावळ:- मावळ तालुक्यातील लोणावळा येथील ज्योती कंधारे यांनी कोईमतुर (तामिळनाडू) येथे मागील महिन्यात झालेल्या एशियन पॉवर लिफ्टींग चॅम्पियनशिप-२०२२ या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तसेच त्यांना ‘स्ट्राँग वूमन ऑफ एशिया’ हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ज्योती कंधारे यांनी मिळविलेल्या या यशा बद्दल त्यांचा आमदार सुनिल शेळके यांनी सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, बाळासाहेब पायगुडे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष उमा मेहता, माजी नगरसेविका आरोही तळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.




