पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील शाळांना १४ ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर या तालुक्यांना वगळले आहेत. पुढील ४८ तासात राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळेच पुण्यातही आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे.
गेले चार दिवस पावसाने पुणे शहरातही दमदार हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेता उद्या १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, मनपा, खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने शिक्षकांनी शाळेत हजर राहावे असे देखील शासनाने म्हंटले आहे.




