पिंपळे सौदागर : वै. ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दत्तांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूबद्दलचे प्रेम व्यक्त केले. तर मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गुरुचे असलेले महत्त्व पटवून सांगितले. शाळेतील सर्व शिक्षकांना श्रीफळ ,गुलाबपुष्प देऊन वंदन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांन समवेत पर्यवेक्षिका धनश्री सोनवणे,सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी कोटकर , स्नेहा कुशवाह या ८ वी बीच्या विद्यार्थीनींनी केले. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु व शिष्य यांचं नाते काय असते हे पटवून देण्यासाठी एक सुंदर कथा सांगितली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एक एक रोपटे व पुष्प देऊन सन्मानित केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन वर्षा जाधव,सोनाली शेवाळे, राजश्री पल्ली यांनी केले होते.




