लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोगद्यात शुक्रवारी दुपारी एक कार जळून खाक झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास पुणे लेनवर एक कार खंडाळा बोगद्यात आली असता अचानक त्या कार ने पेट घेतला. हे लक्षात येताच कार चालकाने कार थांबवली आणि चालक तसेच कार मध्ये बसलेले प्रवासी तात्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मात्र सदर कार पुर्णतः जळून खाक झाली. या घटनेची माहिती समजताच खंडाळा महामार्ग पोलिस, आयआरबी व देवदूत पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणून ती विझवण्याचा प्रयत्न केला.




