पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज चिंचवड येथे ‘सीएसआर मीट २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विविध उद्योग समूहांचे प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, आयटीआय चे प्राचार्य शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.




