राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचे अभिनंदन
पिंपरी दि. २० – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांठिया आयोग नेमून केलेल्या शिफारशीमुळे सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विजय असून या सर्व नेत्यांचे तसेच ओबीसी आरक्षणासाठी झगडणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय आरक्षण मान्य करून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आज (दि. २०) दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

गव्हाणे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण गोठविण्यात आले होते. हे आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी वर्षभरापासून ताकद पणाला लावली होती. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोराव व महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता हा ओबीसी आरक्षणासाठी आग्रही होते.
आज जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे त्याला बांठिया आयोगाने सादर केलेला अहवाल कारणीभूत आहे. तात्कालीन महाविका आघाडी सरकारने बांठिया आयोगाची नियुक्ती केली होती. बांठिया आयोगाने ओबीसी आरक्षणासाठी आपल्या अहवालामध्ये आग्रही भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे गेले वर्षभर ओबीसी आरक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाला यश आल्याचा दावाही गव्हाणे यांनी केला.
- गेल्या १५ दिवसांत ओबीसी आरक्षणातील ‘ओ’ देखील काढलेला नसताना ओबीसी आरक्षण श्रेय कशासाठी
भाजप नेत्यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या
भारतीय संविधान आणि प्रत्येक आरक्षण धोक्यात आणणारे भाजप नेते ओबीसी आरक्षणाचे श्रेय लाटत आहेत, हा अत्यंत दुर्देवी प्रकार असल्याचा टोलाही गव्हाणे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे यश असल्याचा दावा भाजपनेत्यांकडून केला जात आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस यांचे सरकार आले आहे. या कालावधीत एकमेकांवर चिखलफेक करणे, फोडाफोडी करणे, दिल्लीवारी करणे आणि शुभेच्छा स्विकारणे यापलिकडे शिंदे आणि फडणवीस यांनी कोणतेही काम केलेले नाही. ओबीसी आरक्षणातील ‘ओ’ देखील या मान्यवरांनी गेल्या १५ दिवसांत काढलेला नसताना ओबीसी आरक्षण आम्ही मिळवून दिले म्हणणे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असल्याचा टोलाही गव्हाणे यांनी भाजपनेत्यांना लगावला आहे.
यावेळी ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे यांनी शहराध्यक्ष व पदाधिकारी यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला व ओबीसी सेल महीला अध्यक्ष सारिका पवार यांनी सुप्रिम कोर्टच्या निर्णयाचे स्वागत तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले.
यावेळी महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, माजी नगरसेवक सतीशदादा दरेकर, माजी नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, युवक इम्रान शेख, कविताताई खराडे, सचिन आवटे, पिके महाजन, काशिनाथ जगताप, दत्तात्रय जगताप, विकास साने, प्रकाश आल्हाट, उत्तम आल्हाट, आनंदा कुदळे, सतिश चोरमले, विशाल जाधव, विशाल आहेर, अलंकार हिंगे, तुकाराम बजबळकर, समिता गोरे, रासकर मॅडम, वाघोले मॅडम, तुषार ताम्हाणे इत्यादी मान्यवरांचा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




