पिंपरी (प्रतिनिधी) मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात गेले तरी पिंपरी चिंचवड शिवसेनेला काहीही फरक पडत नाही उलट उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणखी मजबूत होणार असल्याचा दावा पिंपरी चिंचवड शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनी केला आहे.
काल मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त साअमोर आले. ही बातमी पिंपरी चिंचवड शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना फुटली शहरातील एकमेव खासदार असणारे श्रीरंग बारणे शिवसेनेला सोडून शिंदे गटात सामील झाले. यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली. याविषयी शहर प्रमुख व शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भोसले यांना याबाबत अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले की ” खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे गटात गेले हा त्यांचा हा वैयक्तिक निर्णय असून पिंपरी चिंचवड शहरातील व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असून कोणीही शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेलेले नाही.
जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणी खासदार बारणे समर्थक जाणार असतील तर खुशाल जावे, त्याने पिंपखासदार श्रीरंग बारणे यांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडत नाही ; सचिन भोसलेरी चिंचवड शिवसेना पक्ष संघटनेत काहीही फरक पडणार नाही. पिंपरी चिंचवड शिवसेना संघटना अधिक मजबूत होणार आहे. उलट खासदार श्रीरंग बारणे यांना उद्धव ठाकरे साहेबांनी काय नाही दिले ? याचे श्रीरंग बारणे यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला सचिन भोसले यांनी लगावला आहे.




