पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड शहर विकसित करायचे तर अभ्यास आणि दूरदृष्टी लागतेच. पण पूर्वसूरींविषयी असणारा आदर, त्यांचा दृष्टिकोन समजावून घेण्याचे मोठेपणही आवश्यक असते. त्याचसोबत हवा असतो, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असणारे नेतृत्व. या साऱ्या गुणांचा समुच्चय म्हणजे माननीय अजितदादा पवार…. आणि याच गुणांच्या साहाय्याने जगात सर्वाधिक वेगाने परिपूर्णरित्या नियोजनबद्ध विकसित झालेले शहर म्हणजे आपलं पिंपरी चिंचवड…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तयार झाली. शहराच्या विकासाची पहाट 1970 पर्यंत ग्रामपंचायतीचे गावठाण असणारा हा भाग 1982 मध्ये महापालिकेत परावर्तित झाला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्ट 1962 ला उद्योगनगरी करण्यासाठी एमआयडीसीची स्थापना केली. त्यानंतर या गावठाणात विकासाची पहाट झाली. 1980 मध्ये जाणता राजा शरद पवार यांनी हिंजवडी येथून संत तुकाराम सहकारी साखर कारखाना हलवून आयटी पार्कची स्थापना केली आणि या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले. मात्र या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे श्रेय निर्विवाद राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेच. पुढील ५० वर्षांची शहराची गरज ओळखून नियोजनबध्द विकास कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून संपूर्ण देशात पिंपरी चिंचवडकडे पाहिले जाते. त्यामागे अजितदादा यांनी केलेले नियोजनबध्द काम आणि प्रसंगी स्वत: मैदानात उतरून घडवून आणलेला विकासच कारणीभूत आहे.
पिंपरी- चिंचवड आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळख
शहरात आलेल्या आयटी कंपन्यांना हिंजवडी आयटी पार्क आणि तळवडे आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या भागात स्थिरावल्या. मात्र त्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन रुंद रस्ते, अखंड वीज, उत्तम शिक्षण संस्था, अद्ययावत वैद्यकीय सुविधा यांची बांधणी करण्याचा चंग त्यांनी बांधला. आज वाकड पिंपळे सौदागर रहाटणी विशालनगर परिसर झपाट्याने विकसित झाला. एवढेच नव्हे तर शहराला बेस्ट सिटी बनवण्याचे स्वप्न दादांनी प्रत्यक्षात साकार केले.
आज पिंपरी- चिंचवड हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याचे एकमेव कारण म्हणजे अजित पवार यांचे नेतृत्व आणि निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेण्याची धडाडी. आज एखाद्या प्रगत पाश्चिमात्य देशालाही लाजवतील असे रुंद रस्ते, अनेक मजली उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर याद्वारे निगडी ते बोपोडी आणि हिंजवडी ते भोसरी असा विस्तृत विस्तार असणार्या शहरात कोठेही ‘वाहतूक कोंडी’ हा शब्द ऐकू येत नाही. याच कारण म्हणजे अजितदादा यांनी केलेल्या पुढील वीस वर्षाचे नियोजन होते.
पिंपरी चिंचवड शहर प्रेमातून मेट्रोचे नामांतर …
राज्याचे उपमुख्यमंत्री बनताच त्यांनी पुणे मेट्रोचे नामांतर ‘पुणे पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प’ असे केले. हा बदल कोणत्याही विरोधाविना सहजगत्या केला. त्यातून त्यांचे शहरावर असणारे प्रेम अधोरेखीत झाले आहे.
झोपडपट्टीमुक्त शहराचा ध्यास….
शहरात असणार्या अनेक झोपडपट्टीचा विकास त्यांनी एसआरए योजनेच्या माध्यमातून करत त्यांचे पुनर्वसन केले. मात्र, अजूनही झोपडपट्टीत असह्य जीणं जगणाऱ्या नागरिकांना उत्तम जीवनमान मिळावं यासाठी झोपडपट्टीमुक्त शहराचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांच्या स्वभावाला आणि कार्यपध्दतीला अनुसरून ते यात यशस्वी होतील यात शहरवासीयांच्या मनात कोणतीही शंका नाही.
‘करेन ते उत्तमच आणि दर्जेदार…. ‘शहर केवळ रस्ते आणि मुलभूत सुविधा पुरवून मोठे किंवा विकसित होत नाही. त्यासाठी शहराच्या नागरिकांची सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक जाण प्रगल्भ व्हायला हवी, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रकल्प उभे केले. ऑटो क्लस्टर, आचार्य अत्रे रंगमंदिर, रामकृष्ण मोरे सभागृह, निळू फुले नाट्यगृह असे अनेक प्रकल्प राबवले. नेहरूनगर येथे हॉकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. ‘मी पिंपरी चिंवडकरांचा आणि पिंपरी चिंचवड माझे’ असे अजितदादांचे या शहराशी अतूट नाते निर्माण झाले. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरासाठी अनेक विकास कामांची गंगा शहरासाठी उघडून दिली. त्यांनी बारामती एवढेच पिंपरी चिंचवड शहरावरती आपल्या दोन्हीही मुलाप्रमाणे प्रेम केले. असे पिंपरी चिंचवड शहराचे भाग्यविधाते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत…..




