तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी संदीप गाडेकर ) दिनांक २२ जुलै २०२२ आषाढ वद्य नवमी विष्णू गोविंद देशपांडे तथा अण्णासाहेब विजापूरकर यांचे ९६ वे पुण्यस्मरण पारतंत्र्याच्या काळात १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र हाती घेऊन महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणारे नवीन समर्थ विद्यालय स्थापन केली.
मातृभाषेतून अध्ययन उपासनेस आणि व्यवसाय शिक्षणास प्राधान्य देणारे हे विद्यालय नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची ही प्रथम शाळा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या संस्थेचे प्रथम अध्यक्ष आहे तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर हे संस्थापक चिटणीस पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय चळवळीस हातभार लावणारी आणि देशभक्त या विद्यालयाने घडविले क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे या नवीन समर्थ विद्यालया चे माजी विद्यार्थी आज गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचे 96 वे पुण्यस्मरण यानिमित्ताने विद्यालयात गुरुवर्य अण्णासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गणेशशेठ खांडगे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे ,सहसचिव नंदकुमार शेलार , प्रगती विद्या मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे ,श्री एकविरा विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा गोपाळे ,पैसाफंड प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर ,नूतन इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य वधवा सर, NCER इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य सौ पांडे , गुणवंत कामगार व पर्यावरणप्रेमी श्री. पानसरे ,समर्थ विद्यालयाचे प्राचार्य संजय वंजारे, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे तसेच संस्था पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते




